लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य थायबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५, लातूर येथे आयोजित या स्पर्धेच्या समारोप सोहळा संपन्न झाला भारतीय जनता पक्षाच्या लातूर जिल्ह्यातील अर्चना पाटील चाकूरकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या खेळाडूंनी अद्भुत कौशल्य, शिस्त, जिद्द आणि क्रीडाभाव दाखवत सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेमुळे राज्यातील युवा खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळेल, थायबॉक्सिंगसारख्या क्रीडाप्रकाराचा अधिक विकास होईल, आणि महाराष्ट्र क्रीडाक्षेत्रात अधिक बलवान होईल, असा विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केली आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, तसेच या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संपूर्ण आयोजन समितीचेही हार्दिक अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र थायबॉक्सिंग सेक्रेटरी जमीर शिक्कलगार, स्पर्धेसाठी ऑब्झर्वर म्हणून तेलंगणाहून आलेले मोहम्मद फरीदोद्दीन, आयोजक फरहान नबी, संजय रंदाळे, श्रीराम कुलकर्णी व महाराष्ट्रभरातून आलेले बॉक्सर्स, कोच अंपायर्स व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis