छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंबेफळ येथील जिल्हा परिषद शाळेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस राम बाबा शेळके यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप व समाजप्रबोधनकार ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांचे व्याख्यान संपन्न झाले
त्याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार रावसाहेब पाटील दानवे , सभापती श्री राधाकिशन बापू पठाडे, ज्येष्ठ नेते श्री दामू अण्णा नवपुते ,अध्यात्मिक आघाडी संयोजक श्री रामूकाका शेळके, ज्येष्ठ नेते श्री सजननाना मते, श्री भाऊराव मामा मुळे, मंडळ अध्यक्ष श्री सुदाम ठोंबरे, श्री शिवाजी वाघ, जिल्हा उपाध्यक्ष श्री सजन बागल, श्री अशोक साळुंखे, व पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.!
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis