स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाची पुणे जिल्ह्यात होणार दमदार सुरुवात
पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)। महिला व बालकांचे आरोग्य ही सक्षम कुटुंब व समाजाची मूलभूत गरज आहे. याच उद्दिष्टाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्वस्थ नारी – सशक्त परिवार हा विशेष उपक्रम संपूर्ण देशभरात तसेच पुणे जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या क
jgh


पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

महिला व बालकांचे आरोग्य ही सक्षम कुटुंब व समाजाची मूलभूत गरज आहे. याच उद्दिष्टाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्वस्थ नारी – सशक्त परिवार हा विशेष उपक्रम संपूर्ण देशभरात तसेच पुणे जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत महिला व बालकांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसह पोषण, लसीकरण, क्षयरोग तपासणी, रक्तदान शिबिरे आदी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन दि. १७ सप्टेंबर रोजी बारामती स्त्री रुग्णालय येथे मा. सुनीत्रा पवार, खासदार (राज्यसभा) यांच्या हस्ते होणार असून, सर्व तालुक्यांमध्ये मा. खासदार/आमदार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील (भाप्रसे), उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. दीपक साळुंखे करीत आहेत.

अभियानातील प्रमुख सेवा :

स्तन, गर्भाशय मुख व तोंडाच्या कर्करोग तपासणी

उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी (NCD)

गर्भवती महिलांची तपासणी व मदर-चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड वितरण

लसीकरण, रक्तक्षय तपासणी, मासिक पाळी स्वच्छता जनजागृती

क्षयरोग तपासणी व निक्षय मित्र स्वयंसेवी नोंदणी

TB Screening व रक्तदान शिबिरे

पोषण जनजागृती, समुपदेशन व पूरक आहार माहिती

आयुष्यमान भारत – पीएमजय व वयोवृद्ध वंदना कार्ड वितरण

विशेष उपक्रम :

१७ सप्टेंबर रोजी जिल्हा व तालुका रुग्णालयांत मेगा निदान शिबिर

२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष शिबिरे

आरोग्य शिबिरांचे नियोजन :

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आठवड्यातून एकदा तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी (३२४ शिबिरे)

उपकेंद्र स्तरावर आठवड्यातून दोनदा CHO मार्फत तपासणी (३३२४ शिबिरे)

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयी तसेच इतर शासकीय कार्यालयांसाठी स्वतंत्र शिबिरे

या शिबिरांत स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसिक आरोग्य तज्ज्ञ, कर्करोग तज्ज्ञ आदींच्या मार्फत तपासणी केली जाणार आहे.

विभागीय समन्वय :

महिला व बालविकास विभाग – पोषण सप्ताहाचे आयोजन, किशोरवयीन मुला-मुलींसाठी आरोग्य समुपदेशन

समाजकल्याण विभाग – आदिवासी लाभार्थ्यांसाठी आरोग्य सेवा, HB व सिकलसेल स्क्रीनिंग

डीआरडीए विभाग – बचतगट, स्वयंसेवकांची बैठक व जनजागृती

ग्रामपंचायत विभाग – प्रचार साहित्य, मान्यवरांची उपस्थिती सुनिश्चित करणे

या उपक्रमासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, रोटरी क्लब व इतर संस्था सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत. यासाठी तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर महिला वैद्यकीय नोडल अधिकारी नेमण्यात आले असून, आशा स्वयंसेविका व आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

स्वस्थ नारी म्हणजे सशक्त परिवार, आणि सशक्त परिवार म्हणजे सशक्त समाज या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande