बेकायदेशीर बेटिंग ऍप प्रकरणात युवराज सिंग, रॉबिन उथप्पा आणि सोनू सूदला ईडीचे समन्स
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.) ईडीने माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा तसेच अभिनेता सोनू सूद यांना कथित बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग ऍपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तिघांचीही चौकशी केली जाणार आहे. रॉबिन उथप्
युवराज, रॉबिन उथप्पा, सोनू सूद


नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.) ईडीने माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा तसेच अभिनेता सोनू सूद यांना कथित बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग ऍपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तिघांचीही चौकशी केली जाणार आहे. रॉबिन उथप्पा, युवराज सिंग आणि सोनू सूद यांना पुढील आठवड्यात वेगवेगळ्या दिवशी हजर राहण्यास आणि १xBet नावाच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत त्यांचे जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.

रॉबिन उथप्पाला २२ सप्टेंबर, युवराज सिंगला २३ सप्टेंबर आणि सोनू सूदला २४ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या काही आठवड्यात या प्रकरणात तपास यंत्रणेने माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांचीही चौकशी केली आहे. याशिवाय, सोमवारी या प्रकरणात माजी तृणमूल काँग्रेस खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहे.

चौकशीदरम्यान ईडीला हे समजून घ्यायचे आहे की, या अ‍ॅपमध्ये क्रिकेटपटूंची काय भूमिका किंवा संबंध होते. युवराज किंवा उथप्पाने या बेटिंग ऍपच्या प्रमोशनमध्ये त्यांची प्रतिमा वापरली आणि त्या बदल्यात कोणतेही पैसे घेतले का याची ईडी चौकशी करत आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चौकशी सुरू आहे आणि उथप्पा आणि युवराज यांचे जबाबही या कायद्याअंतर्गत नोंदवले जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande