सेवा पंधरवडा कालावधीत सर्वांनी समर्पित भावनेने काम करा :  कोल्हापूर जिल्हाधिकारी
कोल्हापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ''सेवा पंधरवडा'' राबविण्यात येणार आहे. या सेवा पंधरवडा कालावधीत सर्वांन
सेवा पंधरवडासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतलेली बैठक


कोल्हापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येणार आहे. या सेवा पंधरवडा कालावधीत सर्वांनी समर्पित भावनेने काम करण्याचे काम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

यावेळी ते म्हणाले राज्यात महसूल विभागामार्फत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणारे कार्यक्रम हे निरंतरपणे राबविले जाणारे कार्यक्रम आहेत. तथापि, या कालावधीत ते मोहीम स्वरुपात युद्धपातळीवर राबविण्यात येतील. हे अभियान 'पाणंद रस्तेविषयक मोहीम', 'सर्वांसाठी घरे' योजनेच्या अंमलबजावणीसाठी पूरक उपक्रम आणि जिल्हा प्रशासनामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम अशा तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहेत.

सेवा पंधरवड्यात राबवावयाचे टप्पेनिहाय उपक्रमातंर्गत शासन निर्देशांनुसार दिलेले कामकाज प्रभावीपणे राबविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या दैनंदिन उपक्रमामध्ये दिनांक 17 सप्टेंबर रोजी तालुक्यातील मंडळ निहाय दोन गावांची निवड करुन पाणंद रस्ते कार्यक्रम प्रसिध्दी, गाव शिवार फेरी व गावातील रस्त्यांची यादी तयार करणे (प्रपत्र 1,2) यामध्ये ग्रामपंचायत व ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक, पोलीस पाटील इत्यादींचा सहभाग असणार आहे.

दिनांक 18 व 19 सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेवून यादी अंतिम करणे, ग्राम ठरावासह यासदी तहसिलदार यांना सादर करणे व अतिक्रमण रस्त्याबाबत प्रस्ताव सादर करणे यामध्ये ग्रामपंचायत व ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक, पोलीस पाटील इत्यादींचा सहभाग असणार आहे.

दिनांक 20 सप्टेंबर रोजी भूमि अभिलेख विभागाकडून गाव नकाशातील रस्त्याबाबतआवश्यक ठिकाणी सीमांकन करणे. तहसिलदार यांनी रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत सुनावणी घेवून आदेश पारीत करणे यामध्ये ग्रामपंचायत व ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी, भुकरमापक, महसूल सेवक, पोलीस पाटील, तहसिलदार, उप अधिक्षक भुमि अभिलेख इ.सहभागी होणार आहेत.

दिनांक 21 सप्टेंबर रोजी अतिक्रमण निष्कासित करणे, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे यामध्ये ग्रामपंचायत व ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी, भुमि अभिलेख प्रतिनिधी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक, पोलीस पाटील इ.सहभागी होणार आहेत.

दिनांक 22 सप्टेंबर रोजी भुमि अभिलेख विभागाकडून दुय्यम पुनर्विलोकन नकाशात नोंदी घेणे यामध्ये उप अधिक्षक भुमि अभिलेख, भुकरमापक यांचा सहभाग तर दिनांक 29/08/2025 चे शासन निर्णयप्रमाणे रस्त्यांसाठी विशिष्ट क्रमांक निश्चीत करणे व ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रपत्र -3 गाव नमुना 1 (फ) (गावातील रस्त्यांची नोंदवही अद्यावत करणे) यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसिलदार सहभागी होणार आहेत.

दिनांक 23 सप्टेंबर रोजी प्रत्येक मंडळ अधिकारी स्तरावर फेरफार अदालत घेवून प्रलंबीत फेरफार निर्गत करणे, भटक्या विमुक्त जातींसाठी 14 प्रकारचे विशेष लाभ देणेसाठी शिबीर आयोजित करणे यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी सहभागी होणार आहेत.

दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय प्लॅस्टीकमुक्ती या विषयाबाबत निबंध स्पर्धा होणार असून यामध्ये संबधीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार सहभागी होणार आहेत.

दिनांक 25 सप्टेंबर रोजी प्लॅस्टीकमुक्ती या विषयाबाबत पथनाट्य होणार असून यामध्ये संबधीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार सहभागी होणार आहेत.

दिनांक 26 सप्टेंबर रोजी सर्वांसाठी घरे या उपक्रमातंर्गत शासकीय जमीनीवरील अतिक्रमणधारकांना जागेचे पट्टे वाटप करण्यात येणार असून यामध्ये निवासी उप जिल्हाधिकारी कोल्हापूर, तहसिलदार महसूल, नायब तहसिलदार महसूल यांचा सहभाग असणार आहे.

दिनांक 27 सप्टेंबर रोजी किल्ले पन्हाळगड येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये संबधीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार सहभागी होणार आहेत.

दिनांक 28 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय नशामुक्ती रॅली आयोजित करण्यात आली असून यामध्ये संबधीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार सहभागी होणार आहेत.

दिनांक 29 सप्टेंबर रोजी प्रलंबीत माहिती अधिकार अर्ज निर्गती, माहिती अधिकार व सेवा हमी कायदा, माहितीपर कार्यक्रम होणार असून यामध्ये संबधीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार सहभागी होणार आहेत.

दिनांक 30 सप्टेंबर रोजी आपले सरकार सेवा केंद्र व तलाठी कार्यालयाचे लोकेशन गुगल नकाशावर निश्चित करण्यात येणार असून यामध्ये संबधीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार सहभागी होणार आहेत.

दिनांक 1 ऑक्टोबर रोजी प्रत्येक मंडळ अधिकारी स्तरावर चौकशी कामी प्राप्त प्रकरणांची निर्गती करण्यात येणार असून यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी सहभागी होणार आहेत.

दिनांक 2 ऑक्टोबर रोजी फलनिष्पत्ती व समारोप कार्यक्रम होणार असून यामध्ये तहसिल, उपविभाग व जिल्हा स्तर सहभागी होणार आहेत.

हे अभियान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्यासाठी व त्याचे समस्या निराकरण करण्याकामी कृती आराखडा तयार केला आहे. त्याची परिणामकारक अंमलबजावणी करुन संपुर्ण अभियान राबवण्यात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर राहील, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande