लातूर, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तीन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी पालकमंत्री श्री. भोसले यांचे १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४६ वाजता लातूर येथील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आगमन होईल. याठिकाणी सकाळी ९ वाजता त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन होईल. सकाळी १० वाजता लातूर तालुक्यातील निवळी येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. लातूर शहरातील गंजगोलाई येथे सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला पालकमंत्री उपस्थित राहतील. सकाळी ११.४० वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. याच ठिकाणी दुपारी १.४५ वाजता त्यांच्या उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील गोधन खरेदी विक्री व वाहतुकीबाबत बैठक व त्यानंतर अतिवृष्टीबाबत संबंधित शासकीय विभागांची आढावा बैठक होईल.
पालकमंत्री श्री. भोसले यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात लातूर जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल. सायंकाळी ५ ते ५.३० वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे राखीव. सायंकाळी ५.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून उदगीर तालुक्यातील हंडरगुळी (बाजार) कडे प्रयाण करतील.
हंडरगुळी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सायंकाळी ६.१५ वाजता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अनावरण होईल. सायंकाळी ७.४० वाजता हंडरगुळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष बालाजी विनायकराव भोसले यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सोयीनुसार लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पालकमंत्री श्री. भोसले लातूर शासकीय विश्रामगृह येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करतील. सकाळी १० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथून साताराकडे प्रयाण करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis