गडचिरोली: मस्कऱ्या गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी
गडचिरोली., 16 सप्टेंबर (हिं.स.)आगामी मसक-या गणेशोत्सव मिरवणूकी मध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी १६ ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल
गडचिरोली: मस्कऱ्या गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी


गडचिरोली., 16 सप्टेंबर (हिं.स.)आगामी मसक-या गणेशोत्सव मिरवणूकी मध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी १६ ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३(१) अंतर्गत याबाबत आदेश जारी केला आहे.

हा निर्णय मागील वर्षी कोल्हापूरमध्ये लेझर लाईटमुळे डोळ्यांना झालेल्या दुखापती आणि यवतमाळ येथे धार्मिक तेढ निर्माण झालेल्या घटनांमुळे घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande