काँग्रेस खासदार कल्याण काळेंकडून पैठण तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर, (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये चार दिवसाच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथे अधिक शेती वाहून गेली आहे. पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी लोकप्रतिनिधी शेतक
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर, (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये चार दिवसाच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथे अधिक शेती वाहून गेली आहे. पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पैठण तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला आहे. तसेच

पूरग्रस्त गावांची पाहणी केली.

पैठण तालुक्यातील शेकटा, लोहगाव, राहुल नगर, कातपूर व वाघाडी या गावांना भेट देऊन पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला. गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे प्रचंड नुकसान लक्षात घेऊन पैठण तहसीलदार श्रीमती ज्योती पवार यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून,आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू असा शब्द दिला

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande