मुंबई, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये 2 रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी केली आहे. युएचटी दूधावरील जीएसटी 5% वरून 0% करण्यात आला आहे, त्यामुळे 22 सप्टेंबर 2025 पासून या दूधाची एमआरपी कमी होणार आहे. त्याशिवाय, कंपनीने काही व्हॅल्यू अॅडेड डेअरी प्रॉडक्ट्स आणि प्रोसेस्ड फूड्सच्या किमती देखील कमी करण्याचे जाहीर केले आहे. या सर्व नवीन किंमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील.
मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलिश यांनी सांगितले, “डेअरी आणि प्रोसेस्ड अन्न उत्पादनांवरील जीएसटी कपात हा एक प्रगतीशील निर्णय आहे. यामुळे खपात वाढ होईल आणि सुरक्षित, उच्च गुणवत्तेच्या पॅकेज्ड उत्पादनांचा स्वीकार वाढेल. आमच्या ग्राहकांना 100% कर लाभ देण्यात येत आहे.”
युएचटी दूधाच्या नवीन किंमती - टोन्ड दूध (1 लिटर टेट्रा पॅक): ₹77 → ₹75, डबल टोन्ड दूध (450 मि.ली. पाउच): ₹33 → ₹32. पनीर : 200 ग्रॅम पॅक: ₹95 → ₹92, 400 ग्रॅम पॅक: ₹180 → ₹174. मलाई पनीर: ₹100 → ₹97 बटर: 500 ग्रॅम पॅक: ₹305 → ₹285, 100 ग्रॅम पॅक: ₹62 → ₹58. मिल्कशेक : 180 मि.ली. पॅक: ₹30 → ₹28. तूप – नवीन किंमती: कार्टन पॅक (1 लिटर): ₹675 → ₹645, टिन (1 लिटर): ₹750 → ₹720, पिशवी दूध (1 लिटर): ₹675 → ₹645. गायचं तूप (500 मि.ली. जार): ₹380 → ₹365, प्रीमियम गायचं तूप – गिर गाय (500 मि.ली.): ₹999 → ₹98४
मदर डेअरीने स्पष्ट केले आहे की फुल क्रीम, टोन्ड मिल्क आणि गायचं दूध जे पिशवीमध्ये विकले जातात, त्यांच्या किंमतीत कोणताही बदल होणार नाही. या उत्पादनांवर पूर्वीपासूनच जीएसटी लागू नव्हता, आणि पुढेही लागणार नाही, त्यामुळे त्यांच्या किंमती स्थिरच राहतील.
अमूलने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, “22 सप्टेंबरपासून पिशवी दूधाच्या किमतीत कोणतीही कपात होणार नाही कारण या उत्पादनांवर आधीपासूनच शून्य जीएसटी लागू आहे.” जीसिएमएमएफ (गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन) चे एमडी जयेन मेहता यांनी सांगितले की, “ताज्या पाउच दूधाच्या किंमतीत बदल प्रस्तावित नाही कारण जीएसटी मध्ये कोणतीही कपात झाली नाही.”
22 सप्टेंबरपासून मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध, घी, मक्खन, पनीर आणि इतर काही उत्पादनं स्वस्त मिळतील. मात्र, दैनिक वापरातलं पिशवी दूध जसं आहे तसंच राहील. त्याच्या किंमतीत कोणताही बदल होणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode