छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि त्यानिमित्त हुतात्मा स्मृतीस्तंभाजवळ पुष्पचक्रांचे अर्पण, शहीदांना मानवंदना अशी जय्यत तयारी दरवर्षी केली जाते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्त औचित्य हुतात्मा स्मृतीस्तंभ रुपाने आणखी दिमाखदार बनले आहे. हुतात्मा स्मृतीस्तंभांची ही संकल्पनेना मुर्तू रुप देण्यात तत्कालीन परिवहन मंत्री तथा नांदेड, परभणी जिल्ह्यांचे पालकमंत्री दिवाकर रावते यांचा पुढाकार होता. त्यांच्या या पुढाकारामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हुतात्मा स्मृतीस्तंभ साकार झाले. मराठवाडा मुक्तीसाठी प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्यविरांच्या हौतात्म्याला चिरस्वरुपी मानवंदना मिळाली.
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनांचा वर्धापन दिनांचा समारंभ या स्मृतीस्तंभांना पुष्पचक्र अर्पण करून, आणि शहीदांना मानवंदना देऊन साजरा करण्यास नांदेड येथून प्रारंभ झाला. नांदेडसह, औरंगाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, जालना, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यात एकाच रुपातील हुतात्मा स्मृतीस्तंभ उभे आहेत. यासाठी तत्कालीन मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी व्यक्तीशः प्रयत्न केले.
नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानात 17 सप्टेंबर 1998 रोजी हुतात्मा स्मृती स्तंभाच्या अनावरणाचा भव्य असा सर्वपक्षीय कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास तत्कालिन विधानसभेचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, नांदेडचे पालकमंत्री श्री. रावते, ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचे सहकारी शंकरराव चव्हाण, प्रतापराव बांगर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक साहेबराव बारडकर, चंद्रकांत म्हस्के भास्कर राव पाटील खतगावकर ,माधवराव किन्हाळकर ,ओमप्रकाश पोकर्णा ,यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकप्रतिनिधीची उपस्थिती होती. श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयमवर यासाठी त्यावेळी भव्य कार्यक्रमही झाला होता. या कार्यक्रमाच्या स्मृती आज पुन्हा जाग्या झाल्या, त्यामराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मृती स्तंभांची रचना आणि त्यावरील शिल्प (म्युरल्स) बाबत एकवाक्यता असावी यासाठीही श्री. दिवाकर रावते दक्ष होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबाबत सर्वांना प्रचंड आत्मियता आहे. या आत्मियतेतूनच हुतात्मा स्मृतीस्तंभांची आणि मुक्ती संग्राम दिनाचा वर्धापन दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. मुक्तीसंग्राम वर्धापनदिन आणि हुतात्मा स्मृतीस्तंभ या दोन्ही गोष्टींना मुर्त स्वरुप मिळावे यासाठी श्री. रावते यांनी केलेले प्रयत्न महत्त्वपुर्ण असेच आहेत.
या स्मृतीस्तंभाशेजारीच हुतात्म्यांच्या बलिदानाला वंदन करणाऱ्या ज्येष्ठ कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या कवितांच्या ओळीही शिलालेखाच्या स्वरुपात आहेत. त्या ओळीही समर्पक अशाच आहेत...या मातीचा टीळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाय तोवर गाणे गाऊ....
मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त आठवणीना उजाळा...
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis