नांदेड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळा दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. विशेष मान्यवर या वेळेला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या वर्षीचा हा बहुमानसंस्कृति संवर्धन मंडळ, सगरोळी, जि. नांदेड या संस्थेला जाहीर झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील या संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे.
मराठवाड्याशी घट्ट नाळ जोडून पुणे-पिंपरी चिंचवड भागात स्थायिक असलेल्या नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतून स्थापन झालेल्या मराठवाडा समन्वय समिती, पुणे तर्फे शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना मानाचा “मराठवाडा भूषण पुरस्कार” प्रदान केला जातो. या वर्षीचा हा बहुमान संस्कृति संवर्धन मंडळ, सगरोळी, जि. नांदेड या संस्थेला जाहीर झाल्याचा आनंद आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रोड, पुणे येथे होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis