अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा बुधवारी (ता.१७सप्टेंबर) रोजी ७५ वा वाढदिवस आहे. या ऐतिहासिक दिनाचे अवचित साधत भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री तथा राज्यसभेचे सदस्य डॉ. अनिल बोंडे हे अमरावतीकरांचं आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनी अंबादेवी व एकवीरा देवी मंदिरात सपत्नीक ७५ दिवे लावणार आहेत. सकाळीच आंबा एकवीरा देवीची आराधना करत ७.३० वाजता महाआरतीच देखील आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात अमरावतीकर नागरिकांनी मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये भारताच्या प्रधानमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यावर ऐतिहासिक आणि तितकेच जागतिक नेतृत्वाचा परिचय देणारे धाडसी निर्णय घेतले. आंतरराष्ट्रीय योग दिवस जगात साजरा करण्याचा निर्णय हे यातील महत्त्वाचे पाऊल होतं. वसुधैव कुटुम्बकम हा नारा देत जगाच लक्ष भारताच्या दिशेने वेधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेचे अध्यक्ष पद देखील भूषवलं, ही बाब भारताच्या कर्तबगारीचा परिचय देणारी होती. याविषयी माहिती देताना खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले, स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री जनधन योजना, उज्वला योजना, स्टार्ट अप इंडिया, आयुष्यमान भारत योजना, घरकुल योजना, आत्मनिर्भर भारत, शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, कोविड महामारीत जगभरात अडकलेल्या - भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मिशन वंदे भारत इत्यादी अभियान राबवून भारताने जागतिक स्तरावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा परिचय दिला. यासह भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतरिक्ष क्षेत्रातही आपला परिचय देत मिशन चंद्रयान ३, मिशन गगन यान इत्यादी मोहिमा यशस्वीपणे हाताळल्या. देशातील नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्तीचाच स्फुलिग चेतवण्यासाठी 'मेरी माटी मेरा देश', हर घर तिरंगा अभियान राबवून जगाचं लक्ष भारताच्या दिशेने वेधून घेतलं. भारत आज वैश्विक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे, डॉ. वसुधा बोंडे यांच्या पुढाकारातून अमरावतीच आराध्य दैवत असलेल्या अंबा एकविरा मातेच्या मंदिरात १७सप्टेंबरला सकाळी ७.३० वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ दिवे लावले जाणार आहेत. दरम्यान महाआरती केली जाणार आहे. या ऐतिहासिक क्षणाच साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक अंबानगरी वासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी