सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लीअस बजेट) योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर कार्यालयामार्फत लाभार्थ्यांकडून वैयक्तिक व सामूहिक (बचतगट) योजनांसाठीhttps://www.nbtribal.inया पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते.
प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रांची त्रुटी आढळून आल्याने संबंधित अर्जदारांना त्रुटी लावून अर्ज परत पाठविण्यात आले आहेत. या त्रुटींची यादी कार्यालयाच्या नोटिस बोर्डवर तसेच पोर्टलवरील लाभार्थी लॉगिनमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे.
सदर त्रुटींची पूर्तता ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी स्वतःचा आयडी व पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉगिन करावे व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड