छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)पैठण तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी शेती कर्जाच्या आणि पीक विम्याच्या कारणावरून आत्महत्येचा मार्ग पत्करला. या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ मदत देण्याच्या सूचना काँग्रेस पक्षाचे खासद
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)पैठण तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी शेती कर्जाच्या आणि पीक विम्याच्या कारणावरून आत्महत्येचा मार्ग पत्करला. या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ मदत देण्याच्या सूचना काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण काळे यांनी तहसीलदार ज्योती पवार यांना आज केल्या आहेत.

आपेगाव येथील शेतकरी ज्ञानदेव कुंडलिकराव आवटे यांनी शेती कर्जाच्या मोठ्या ओझ्यामुळे आत्महत्या केली. आवटे कुटुंबीयांची आज मंगळवारी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पुढील शासकीय मदत तातडीने मिळावी यासाठी तहसीलदार सौ. ज्योती पवार यांना सूचना केली.

नवगाव येथे शेतकरी भाऊसाहेब बाबुराव धनावडे यांनी देखील पीककर्जाच्या कारणामुळे आत्महत्या केली होती. धनावडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या कुटुंबाला शासनाची तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी संबंधित तहसीलदारांना स्पष्ट सूचना केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande