रायगड : पोलादपूर तालुक्यात आरोग्य कॅम्पचे आयोजन
रायगड , 16 सप्टेंबर (हिं.स.) : मोरगिरी, सडवली आणि चोळाई ग्रामपंचायतीतील असंघटित इमारत बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पोलादपूर तालुक्यात आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आला. हा उपक्रम मंत्री नामदार भरत गोगावले,
The initiative to provide health services and benefits to workers is commendable.


रायगड , 16 सप्टेंबर (हिं.स.) : मोरगिरी, सडवली आणि चोळाई ग्रामपंचायतीतील असंघटित इमारत बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पोलादपूर तालुक्यात आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आला.

हा उपक्रम मंत्री नामदार भरत गोगावले, युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या सहकार्याने व सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कॅम्पमध्ये 100 ते 200 कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करून योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला तालुकाप्रमुख निलेश अहिरे, उपतालुकाप्रमुख सतीश शिंदे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, महिला आघाडी संघटिका गीता दळवी, महाळुंगे सरपंच विकास नलावडे, युवा सेना समन्वयक विक्रम भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

हिंद संस्थेच्या टीममार्फत लॅब टेक्निशियन सोपान निकम, अमर पवार व प्राजक्ता पवार यांनी तपासणी केली. शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडलेला हा कॅम्प उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कामगारांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन शिवसेनेच्या पुढाकाराने राबवलेला हा उपक्रम प्रशंसनीय ठरला असून, अशा कॅम्पमधून कामगारांना हक्काची सेवा व शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मदत होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande