सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। तपस्वी ब्रह्मदेवदादा माने प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा आचार्य दादासाहेब दोंदे पुरस्कार जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांच्यासह आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक व शाळांना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
जुळे सोलापुरात शानदार कार्यक्रमात बोलताना कृषी सभापती दिलीप माने म्हणाले की शिक्षक व पालकांनी मुलांना ज्यांच्या – त्यांच्या कुवतीप्रमाणे अभ्यास किंवा इतर एक्टीव्हीटीज करण्याची मुभा द्यावी. यावेळी 5 आदर्श व्यवस्थापन समिती, 5 आदर्श शाळा, 10 गुणवंत शिक्षक, 2 गुणवंत अधिकारी, 1 गुणवंत केंद्रप्रमुख, 1 गुणवंत मुख्याध्यापक, 1 गुणवंत कर्मचारी आणि 1 जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कारमूर्तीना प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते गौरविण्यात आले. 10 वी व 12 परिक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्याचाही यावेळी गौरव करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, उत्तरचे माजी सभापती संभाजी भडकुंबे, राष्ट्रीय संघांचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, उत्तरचे गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार, दक्षिणचे गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, राष्ट्रीय संघाचे महासचिव म. ज. मोरे, जिवराज खोबरे, शिक्षक संघ सल्लागार मंडळाचे अध्यक्ष लहू कांबळे, बब्रुवाहन काशीद, आप्पासाहेब देशमुख, जिल्हा संघांचे कार्यकारी अध्यक्ष रणजीत थिटे, सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे, कोषाध्यक्ष महादेव जठार, महिला आघाडीच्या सरचिटणीस सिता नामवार, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश राचेट्टी, उपाध्यक्ष शिवाजी वडते, जेष्ठ संचालिका मंगल नाईकनवरे व इतर सर्व संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड