अकोल्यात २० वर्षांनंतर नीलकंठ सूत गिरणीचा पुनरारंभ
अकोला, 17 सप्टेंबर (हिं.स.)। अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन तब्बल दोन दशकांपासून बंद असलेली नीलकंठ सूत गिरणी पुन्हा सुरु होणार असून, या निर्णयामुळे अकोला जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार र
प


अकोला, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन

तब्बल दोन दशकांपासून बंद असलेली नीलकंठ सूत गिरणी पुन्हा सुरु होणार असून, या निर्णयामुळे अकोला जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांतून गिरणीचा पुनरारंभ शक्य झाला आहे.

या गिरणीच्या बंदमुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक रोजगाराच्या संधी कमी झाल्या होत्या. आता गिरणी सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कापूस उत्पादक शेतक-यांना याचा थेट फायदा होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

अकोला औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मनोज एम. खंडेलवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला नवे आयाम मिळत आहेत. नीलकंठ सूत गिरणीच्या पुनरारंभीमुळे रोजगार वाढेल, शेतक-यांच्या कापसाला नवा बाजारपेठीय आधार मिळेल आणि अकोल्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

आमदार रणधीर सावरकर हे उद्योगपूरक दृष्टिकोनातून काम करीत असून, विविध उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळेच हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला, असेही उद्योग क्षेत्रातून सांगण्यात येत आहे.

या निर्णयामुळे अकोला जिल्हा औद्योगिक नकाशावर ठळकपणे उमटेल आणि भविष्यात नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास उद्योग जगतातून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande