अकोला : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त दिव्याची आरास
अकोला, 17 सप्टेंबर (हिं.स.) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठे राम मंदिरात ७६ दिव्याची आरस करून विशेष प्रार्थना महाआरती करण्यात आली. तसेच राज राजेश्वर ग्रामदेवतांना महाआ
प


अकोला, 17 सप्टेंबर (हिं.स.) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठे राम मंदिरात ७६ दिव्याची आरस करून विशेष प्रार्थना महाआरती करण्यात आली. तसेच राज राजेश्वर ग्रामदेवतांना महाआरती अभिषेक करून त्यांच्या दीर्घायुष्यासोबत त्यांच्या नेतृत्वात देश पण प्रगतीपथावर होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळावा अशी प्रार्थना करण्यात आली तसेच भाजपा कार्यालयात रक्तदान शिबिर तसेच शहरांमध्ये साफसफाई अभियान स्वच्छता अभियान करून कार्यक्रम करण्यात आले.

जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल संतोष शिवरकर शिवरकर जयंत मसने योगेश गोतमारे पवन ,महल्ले यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम करण्यात आले.

आज मोठ्या राम मंदिरात जयंत ,मसणे यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र शब्द गजानन महाराज रामदेव बाबा राणी सती दादी हनुमंत शंकराची विशेष पूजा अर्चना करण्यात आली यावेळी माधव मानकर एडवोकेट देवाशिष काकड, युवराज दांदळे, गिरीश जोशी, मनीष गावंडे, साधना येवले घनश्याम शर्मा पाठक, संजय गोटफोडे हे उपस्थित होते यावेळी छात्तर देवाची आरास करून विशेष पूजा अर्चना करण्यात आली ‌

राज राजेश्वर मंदिरात भाजपा महानगरसेवक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली तसेच शहरामध्ये 27 ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आला पवन महल्ले यांच्या पुढाकाराने भाजपा कार्यालयात 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात सुद्धा मोठमोठे कार्यक्रम करण्यात आले. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande