पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त केला शुभेच्छांचा वर्षाव नवी दिल्ली , 17 सप्टेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७५ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत आणि उत्सव साजरा करत आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंपर्यंत, देश-विदेशातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील पंतप्रधानांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी फोन करून शुभेच्छा दिल्या आणि सोशल मीडियावर पोस्टदेखील शेअर केली. त्यांनी ट्रुथ पोस्टमध्ये लिहिले, “आत्ताच माझ्या मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर खूप छान संवाद झाला. मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. ते खूप चांगले काम करत आहेत.”
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्स पोस्टद्वारे म्हटले, “भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परिश्रमाच्या शिखराचे उदाहरण सादर करत आपल्या असामान्य नेतृत्वाने आपण देशात मोठे उद्दिष्ट साध्य करण्याची संस्कृती निर्माण केली आहे. आज जागतिक समुदायदेखील आपल्या मार्गदर्शनावर विश्वास व्यक्त करत आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करते की आपण सदैव स्वस्थ, आनंदी राहा आणि आपल्या अद्वितीय नेतृत्वाने राष्ट्राला प्रगतीच्या नव्या शिखरांवर घेऊन जा.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी एक्स पोस्टद्वारे म्हटले, “त्याग आणि समर्पणाचे प्रतीक, कोट्यवधी देशवासियांची प्रेरणा, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांना ७५व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सामाजिक जीवनात पाच दशकांपेक्षा अधिक काळ देशवासियांच्या कल्याणासाठी न थांबता, न थकता, अविरत कार्य करणारे मोदी जी प्रत्येक देशवासियासाठी ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेचे सजीव उदाहरण आहेत.”भाजपचे नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी एक्स पोस्टद्वारे लिहिले, “जगातील सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी, नव्या भारताचे शिल्पकार, यशस्वी प्रधानसेवक आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या आत्मीय शुभेच्छा देतो. असे त्यांनी नमूद केले आहे.
संरत्रण मंत्री राजनाथ सिंह आपल्या ट्विटर संदेशात म्हणाले की,, मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाने, देशप्रेमाने आणि अथक परिश्रमाने मोदीजींनी भारताला नवी ऊर्जा, नवी दिशा दिली आहे. त्यांनी भारताची सामर्थ्य आणि सन्मान जागतिक स्तरावर वाढवला आहे. त्यांनी आपल्या अद्वितीय नेतृत्व क्षमतेसह कल्पकतेचे आणि संवेदनशीलतेचे दर्शनही घातले आहे. गरीब कल्याण आणि लोककल्याणासाठी त्यांची बांधिलकी एक आदर्श आहे. विकसित भारताच्या संकल्पासह मोदी देशाला आत्मनिर्भरता, विकास आणि समृद्धीच्या दृष्टीने बळ देत आहेत. देवाकडे प्रार्थना आहे की त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सतत ऊर्जा मिळावी जेणेकरून ते भारताला नवीन उंचीवर घेऊन जात राहतील असे राजनाथ यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode