- लढ्यातील वीर हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन
बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. यावेळी या लढ्यातील वीर हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
मराठवाड्याच्या भूमीला धैर्य, शौर्य व संघर्षाचा वारसा आहे. निजामविरुद्धची ही लढाई जनतेनं स्वतः लढली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या या लढ्यात प्रत्येक समाजघटकाचा सहभाग होता. हा स्वतंत्र लढा विलक्षण ठरला.
हा स्वातंत्र्य लढा आपल्यासाठी अभिमानाचा वारसा आहे. पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याचा मी निर्धार केला आहे. बीड विमानतळ, CIIIT, बीड–अहिल्यानगर रेल्वे सेवा अशा विकासकामांना आम्ही गती देत आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचं वाटप करण्यात आलं. याशिवाय पोलीस अधिक्षक कार्यालयाला प्राप्त झालेल्या वाहनांचं आणि नगर परिषदेनं खरेदी केलेल्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis