नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालय, मुखेड येथे भारतीय जनता पक्षाचे मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार राजेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांतील सदस्यांचे राठोड यांच्या हस्ते शाल व पुष्पहार आणि मिठाई देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामात लढणाऱ्या व बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून सर्वांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या !
यावेळी माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड, गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, खुशालराव पाटील, बालाजीराव पाटील, जगदीश बियाणी, सर्व तहसील कार्यालयातील व पंचायत समितीतील कर्मचारी, पोलीस बांधव, पत्रकार बांधव आणि सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis