कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ग्रामसभेत इशारा; कांद्यास हमीभाव त्वरित जाहीर करावा
नाशिक, 17 सप्टेंबर (हिं.स.)।- कांद्याला आम्ही भावासह तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव घोषित करावा या मागणीसाठी म्हणून जिल्ह्यामध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये हा ठराव शेतकऱ्यांनी मांडून मंजूर केला आहे त्यामुळे आता शासनावरती शेतकऱ्यांचा दबाव वाढत चालला आ
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ग्रामसभेत इशारा : केंद्र शासनाने कांद्यास हमीभाव त्वरित जाहीर करावा!


नाशिक, 17 सप्टेंबर (हिं.स.)।- कांद्याला आम्ही भावासह तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव घोषित करावा या मागणीसाठी म्हणून जिल्ह्यामध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये हा ठराव शेतकऱ्यांनी मांडून मंजूर केला आहे त्यामुळे आता शासनावरती शेतकऱ्यांचा दबाव वाढत चालला आहे .

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये आणि विशेष करून कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचा प्रश्न अतिशय बिकट होत चाललेला आहे या प्रश्नामुळे आता शेतकरी संतप्त होत आहेत अशाच संतप्त शेतकऱ्यांनी आज 17 सप्टेंबर रोजी सेवा सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेच्या निमित्याने कांद्याच्या प्रश्नाला पुन्हा एकदा हात घातला आहे कारण या माध्यमातून सरकार वरती ग्रामसभेत ठराव करून कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन आणि लोकप्रतिनिधींना फोन करून आंदोलन करून आपला दबाव मागणी पूर्ण करण्यासाठी सुरू ठेवलेला होता. आता ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव करून सरकार वरती दबाव अजून वाढवला आहे.

नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आले यामध्ये सिन्नर तालुक्यातील नायगाव ग्रामसभेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कांदा उत्पादक संघटना युवक अध्यक्ष सिन्नर तालुका अरुण चव्हाण यांच्या पुढाकाराने केंद्र शासनाकडे ठोस मागणी करणारा महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला.

या ठरावामध्ये कांदा पिकासाठी प्रतिक्विंटल हमीभाव ₹3,000/- रुपये तसेच यापूर्वी विकल्या गेलेल्या कांद्याला ₹1,500/- प्रतिक्विंटल अनुदान देण्याची ठाम मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या वतीने व कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने हा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.या प्रसंगी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच कांदा उत्पादक शेतकरी बाळासाहेब कातकडे, मारुती भांगरे, गोपीनाथ चव्हाण, गणेश सांगळे, भाऊसाहेब लोहकरे, भाऊसाहेब सांगळे, कैलास सांगळे, संदीप पानसरे, मदन भांगरे, मदन नाठे, नारायण साठे, संजय जेजुरकर, भाऊसाहेब जेजुरकर, संजय भगत, कैलास गरकळ व इतर समस्त कांदा उत्पादक नायगाव शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र शासनाला स्पष्ट संदेश :

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार आश्वासने देऊन पोकळ हवालदारगिरी चालू ठेवू नये. शेतकऱ्यांचा घाम गाळून उगवलेला कांदा सध्या कवडीमोल दरात विकला जात आहे. शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे. केंद्र शासनाने त्वरित हमीभाव ₹3,000/- प्रतिक्विंटल जाहीर करून मागील कांद्यासाठी ₹1,500/- प्रतिक्विंटल अनुदान दिले नाही, तर राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आंदोलनाचा निर्णय घेतील, असा जाहीर इशारा नायगाव ग्रामसभेतून देण्यात आला.

असाच ठराव तालुक्यातील जोगलटेंभी येथील ग्रामपंचायतीतही करण्यात आला आहे अशी माहिती कांदा उत्पादक शेतकरी मनोहर ताठे विनायक जेजुरकर यांनी दिली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande