नाशिक, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी अभियंता आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सुनील केदार म्हणाले की, “सर विश्वेश्वरय्या यांचे देशासाठीचे योगदान अपूर्व आहे. त्यांच्या काळात झालेल्या स्थापत्य शास्त्राच्या अनेक निर्मिती आजही इतिहास साक्ष देतात. पुण्याजवळील खडकवासला धरण, धुळे शहर, कुसुंबा गावातील काम हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.”
प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी युवा अभियंत्यांना प्रेरणा देताना सांगितले की, “स्वदेशी तंत्रज्ञान व संशोधन यावर भर देऊन युवा अभियंते आत्मनिर्भर भारत घडविण्यात पुढाकार घ्यावा. केंद्र व राज्य सरकारने यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यांचा लाभ घेतला पाहिजे.” या प्रसंगी उपस्थित अभियंत्यांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता आघाडीचे सहसंयोजक जयहिंद शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोहित सोनवणे यांनी मानले कार्यक्रमास अभियंता सेल चे प्रदेश उपाध्यक्ष अनंत दंनदणे, अमित घुगे, सुनील देसाई, स्वाती भामरे, संगिता जाधव, बापू शिंदे, शहर संयोजक अमरेंद्र तल्लम, योगेश मटाले, अमित कुलथे, प्रमोद वाघ, सिद्धार्थ श्रीवास्तव, हरीकेश जयतमहाल, रोहित सोनवणे, रोहित सावंत, तेजस वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने अभियंते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV