नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र
टोकियो, 17 सप्टेंबर (हिं.स.) भालाफेकपटू नीरज चोप्रा २०२५ च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात पात्रता मिळवली आहे. नीरजने ८४.८५ मीटर भालाफेकत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश क
नीरज चोप्रा


टोकियो, 17 सप्टेंबर (हिं.स.) भालाफेकपटू नीरज चोप्रा २०२५ च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात पात्रता मिळवली आहे. नीरजने ८४.८५ मीटर भालाफेकत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. नीरज चोप्राचा भालाफेक अंतिम फेरीचा मुकाबला १८ सप्टेंबर रोजी टोकियो येथे होणार आहे. या अंतिम फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर यासारख्या नामांकित भालाफेकपटूंशी तो सामना करणार आहे.

नीरज चोप्राला पॅरिस ऑलिंपिकमधील पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी या स्पर्धेच्या निमित्ताने चालून आली आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या आव्हानाला त्याला सामोरे जावे लागणार आहे. अर्शदने २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये ९२.९७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले होते. तर नीरजला ८९.४५ मीटर भालाफेक करून रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पॅरिस ऑलिंपिकमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी त्याच्याकडे आहे.

पुरुषांच्या भालाफेक अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी भालाफेकपटूंना ८४.५० मीटर भालाफेक करणे आवश्यक होते. नीरज चोप्राने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात ही कामगिरी केली. दरम्यान, मागील जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२३ मध्ये झाल्या होत्या. २०२३ मध्ये नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आता तो यावेळी आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande