वरुण चक्रवर्ती पहिल्यांदाच टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान
दुबई, 17 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमवारीत नंबर वन गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांच्यानंतर नंबर वन स्थानावर पटकावणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. तो आपल्या क्रिकेट कारकीर
वरुण चक्रवर्ती


दुबई, 17 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमवारीत नंबर वन गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांच्यानंतर नंबर वन स्थानावर पटकावणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. तो आपल्या क्रिकेट कारकीर्दीत पहिल्यांदाच अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

भारतीय फिरकी गोलंदाजांनी आशिया कपमध्येही आपली लय कायम राखली आहे. वरुण चक्रवर्तीने युएईविरुद्ध दोन षटकांत फक्त ४ धावा देत एक विकेट आणि पाकिस्तानविरुद्ध ४ षटकांत २४ धावा देत एक विकेट घेतली होती. त्याने क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेतली आहे आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीला मागे टाकले आहे.

अभिषेक शर्मा फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ३१ धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट दुसऱ्या स्थानावर आणि जोस बटलर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रुईस दोन स्थानांनी पुढे सरकून ११ व्या स्थानावर पोहोचला आहे आणि एडेन मार्कराम १० स्थानांनी पुढे सरकून ३० व्या स्थानावर पोहोचला आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानचा साईम अयुब चार स्थानांनी पुढे सरकून पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आणि अभिषेक चार स्थानांनी पुढे सरकून १४ व्या स्थानावर पोहोचला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande