रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : राष्ट्रीय पातळीवर आजपासून २ ऑक्टोबरपर्यंत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार आहे. पावस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अभियानात सर्व उपकेंद्रांच्या ठिकाणी आरोग्य शिबिर होणार आहे.
महिला बचतगटाद्वारे तेल आणि साखरेचा वापर कमी करण्यासाठी मोहीम, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्ड काढणे, आभाकार्ड काढणे, निःक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये १९ सप्टेंबरला चांदोर, २० सप्टेंबरला डोर्ले, २३ सप्टेंबर गावडेआंबेरे, २४ सप्टेंबरला गणेशगुळे, २५ सप्टेंबरला गावखडी, २६ सप्टेंबरला पूर्णगड, २९ सप्टेंबरला पावस प्राथमिक आरोग्यकेंद्र येथे शिबिर होणार आहे.शिबिरात महिला, किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी