राजधानीत प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.)। समाजप्रबोधनाचे महान कार्यकर्ते, विचारवंत आणि साहित्यिक प्रबोधनकार केशवसुत ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभाग
ठाकरे


नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.)। समाजप्रबोधनाचे महान कार्यकर्ते, विचारवंत आणि साहित्यिक प्रबोधनकार केशवसुत ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमास सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्र. उपसंचालक मनिषा पिंगळे, यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी व्यवस्थापक महाराष्ट्र सदन प्रमोद कोलपते यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि प्रबोधनपर कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande