समाज कंटकांना महाराष्ट्र पेटवायचा असेल, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती
मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. मात्र आम्ही त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. आरोपीला त्वरित पकडू, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान समाज कंटकांना अशी कृती करून महाराष्ट्र पेटवायचा असेल, अशी भीती शिवसेना पक्षप्रमुख उद्ध
उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरे


मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. मात्र आम्ही त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. आरोपीला त्वरित पकडू, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान समाज कंटकांना अशी कृती करून महाराष्ट्र पेटवायचा असेल, अशी भीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. आम्ही स्वत:हून दखल घेत तक्रार दाखल करु असंही त्यांनी सांगितले.

दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील दिवंगत मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही अज्ञातांनी पुतळ्याला लाल रंग फासण्याचा प्रयत्न केला. यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तणावाचं वातावरण आहे. घटना समोर आल्यानतंर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस सध्या अज्ञाताचा शोध घेत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंनी मीनाताईंच्या पुतळ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलाय. या घटनेची निंदा करुन चालणार नाही. तर तपास व्हायला हवा. यामागे दोनच प्रकारच्या व्यक्ती असू शकतात. ज्यांना आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते अशा बेवारस माणसाने केले असेल किंवा मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला तेव्हा बिहार बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला, तसा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असेल. याआधी अशी घटना घडली होती. शिवसैनिक त्यावेळीही पेटला होता आणि आजही पेटलाय. पण आम्ही त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलंय, असे ठाकरे म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande