रत्नागिरी शहर भाजपातर्फे सेवा पंधरवड्याला प्रारंभ
रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त व भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा प्रारंभ आज झाला. आज पंत
रत्नागिरी शहर भाजपातर्फे सेवा पंधरवड्याला प्रारंभ


रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त व भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा प्रारंभ आज झाला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरी मंदिर येथे अभिषेक करण्यात आला. शासकीय रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची जबाबदारी संदीप सुर्वे, शंकर शिंदे, दादा ढेकणे व समीर वस्ता यांनी पार पाडली. येत्या १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मांडवी किनारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाची जबाबदारी श्री. माळवदे, राजेंद्र फाळके, सुप्रिया रसाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी नगरपालिका शाळा क्रमांक १५ दामले विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन नीलेश आखाडे , प्रज्ञा टाकळे करणार आहेत. २० सप्टेंबर रोजी रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होममध्ये शिधा व खाऊ वाटप सकाळी १० वाजता केले जाणार आहे. हा कार्यक्रम राजेंद्र पटवर्धन, भक्ती दळी, प्रशांत घाणेकर यांच्या मार्गदर्शनात पार पडणार आहे. मंगळवारी, २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी राजू भाटलेकर, अशोक वाडेकर, पुंडलिक पावसकर काम पाहणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी प्रत्येक बूथवर बूथ बैठका होऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती प्रतिमा पूजन करून केली जाणार आहे. यासाठी नितीन जाधव, चैतन्य केळकर प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. २६ सप्टेंबर रोजी एक पेड माँ के नाम हा कार्यक्रम प्रत्येक बूथमध्ये केला जाणार असून यासाठी वर्षाताई ढेकणे, नितीन गांगण, तुषार देसाई, कामनाताई बेग, प्रसाद बाष्टे मेहनत घेत आहेत. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्रीजींच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम करून खादी वस्तू खरेदी व जनतेस प्रोत्साहन करण्यासाठी मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे. तसेच कार्यालयामध्ये शस्त्र पूजन करून दसरा साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी दादा ढेकणे, सोनाली आंबेकर, शैलू बेर्डे, सारिका शर्मा, नरेंद्र कदम, रामदास शेलटकर व सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी केले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande