अकोला - रेडक्रॉस व डॉ. हेडगेवार रक्तपेढीतर्फे रक्तदान जागृती मोहिम
अकोला, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटीने डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात रक्तदान जागृती मोहिम आखली असून, त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य
P


अकोला, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटीने डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात रक्तदान जागृती मोहिम आखली असून, त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

रक्तदानाच्या राष्ट्रीय मोहिमेत रेडक्रॉस सोसायटी आणि डॉ.हेडगेवार रक्त पेढी या संस्थांचा मोलाचा सहभाग आहे. उपचारादरम्यान गरजेनुसार रक्त मिळाल्याने रूग्णाचे प्राण वाचतात. हे कार्य संस्थांकडून होत आहे. आरोग्याच्या क्षेत्रात या संस्थांचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मंत्री ॲड. फुंडकर यांनी केले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते मोहिमेचा फित कापून शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्र्यांनी मनोगत व्यक्त करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी वर्षा मीना, ‍जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी रेडक्रॉसचे चेअरमन डॉ. किशोर मालोकार यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करून उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी केले. हेड‌गेवार रक्त केंद्राच्या चमूने डॉ. दिलीप पांडे यांच्या मार्गदर्शनात रक्त संकलनाचे कार्य केले. सीए मनोज चांडक ॲड. सुभाष सिंह ठाकूर, संदेश रांदड, अरुंधती शिरसाट, केदार काजळे, अनमोल सिंह बछेर, डॉ. संदीप चव्हाण, प्रकाश गवळी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande