अकोला, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। लाडक्या बहिणींना अजित पवार यांनी भरपूर योजना दिल्या सोबतच लाडक्या बहिणींसाठी शासन स्तरावर जास्तीत जास्त योजना जाहीर करून त्यांची अंमलबजावणी केली सोबतच अजित पवार याांचे निर्णय तसेच शासन घेत असलेल्या महिलां धोरणाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पुढाकार घ्यावा असे उदगार आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत काढले .
यावेळी प्रास्ताविकामध्ये प्रतिभा अवचार यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून घ्यावे असे आमदार अमोल दादा मिटकरी यांना सांगितले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून अजित दादांचे विचार व शासन निर्णय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम महिला आघाडी करत असल्याचे सांगितले.
ही आढावा बैठक शासकीय विश्रामगृह बस स्टँडच्या बाजूला अकोला येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी मंचकावर आ.अमोल मिटकरी,प्रतिभा अवचार,प्रदेश पदाधिकारी संध्या वाघोडे,छायाताई कात्रे,अमोल काळणे,जिल्हा सचिव सुषमा राठोड,विद्यार्थी अध्यक्ष अदनान ,सामाजिक न्याय अध्यक्ष प्रकाश खाडे,बाटा शहर अध्यक्ष रिजवान बाबा,कार्यालयीन सचिव किशोर तेलगोटे,देविदास गावंडे,हरिदास बरिंगे. आदी उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रतिभाताई अवचार यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांची भाषणे झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे