रत्नागिरी : भाजप युवा मोर्चातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
रत्नागिरी, 18 सप्टेंबर, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे रत्नागिरीतील ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर येथे लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांच्या वतीने वाटप करण्यात आले. पंतप्रध
भाजप युवा मोर्चातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप


रत्नागिरी, 18 सप्टेंबर, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे रत्नागिरीतील ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर येथे लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांच्या वतीने वाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहेत. भविष्यात देशासाठी हे नागरिक काम करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे भविष्य हे विद्यार्थी आहेत. हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम करण्यात आला असल्याचे श्री. खंडकर यांनी सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका राजवाडे मॅडम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात आला. यावेळी मनोज पाटणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, वर्षा ढेकणे, दादा ढेकणे, पल्लवी पाटील, देवराज सुर्वे, निलेश आखाडे, राजन पटवर्धन, ज्ञानेश पोतकर, बाबा नाचनकर, सुचिता नाचणकर, मंदार भोळे, संदीप रसाळ, सुप्रिया रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande