मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.)। भोजपुरी पावर स्टार पवन सिंहने रिअॅलिटी गेम शो ‘राइज अँड फॉल’ मधून अचानक एक्झिट केलं आहे. पवन सिंहमुळे हा शो खूप चर्चेत होता. अशा परिस्थितीत शो मध्ये त्यांच्या अचानक एक्सझिट मुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पवन सिंहच्या कुटुंबीयांना त्यांना सेटवर घेण्यासाठी बोलावलं होतं. शो सोडताना पवन सिंह म्हणाले की ते कधीच स्पर्धक नव्हते. ते फक्त काही काळासाठी शो मध्ये सहभागी झाले होते. पवन सिंहच्या आधी रेस्लर संगीता फोगाटने सुद्धा अर्ध्यात शो सोडला होता. संगीता शो मध्ये चांगलं काम करत होत्या. पण त्यांच्या सासऱ्यांच्या निधनामुळे त्यांना शो सोडावं लागलं.
शो मध्ये पवन सिंह, नयनदीप रक्षित, आकृति, आणि धनश्री वर्मा यांच्या सोबत चांगले जुळले होते. त्यांचा हास्यविनोद चाहत्यांना खूप आवडत होता. धनश्री वर्मासोबत त्यांनी फ्लर्ट करताही दिसले होते, आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या काही गोष्टी देखील शेअर केल्या होत्या.
पवन सिंहने शो मध्ये नृत्य केले आणि गाणी गायली. एका एपिसोडमध्ये हिट भोजपुरी गाण्यावर त्यांनी जबरदस्त एनर्जी आणि देसी स्टाइल मध्ये ठुमके मारले. आकृति नेगीही त्यांसोबत नृत्य करत होती. पूल पार्टी सीनमध्येही ते धनश्री वर्मा सोबत ठुमके मारताना दिसले होते.
‘राइज अँड फॉल’ शो ६ सप्टेंबरपासून सुरु झाला असून तो रोज दुपारी १२ वाजता अमेझॉन एमएक्स प्लेयरवर फ्री मध्ये प्रदर्शित होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode