दशावताराची कोटींची उड्डाणे; ९.४५ कोटींचा टप्पा पार
मुंबई, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादामुळे ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाची नवी उंची गाठली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच या चित्रपटाने तब्बल ९.४५ कोटी रुपयांचा टप्पा पार करत विक्रमी कामगिरी केली आहे.
दशावताराची कोटींची उड्डाणे : ९.४५ कोटींचा टप्पा पार


मुंबई, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादामुळे ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाची नवी उंची गाठली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच या चित्रपटाने तब्बल ९.४५ कोटी रुपयांचा टप्पा पार करत विक्रमी कामगिरी केली आहे.

भक्ती, परंपरा आणि कलेचं अनोखं दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सिनेमागृहात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सोशल मीडियावरील कौतुकाची लाट आणि दररोज वाढत असलेली प्रेक्षकसंख्या यामुळे ‘दशावतार’ सातत्याने यशाच्या दिशेने आगेकूच करत आहे.

चित्रपटातील दमदार सादरीकरण, भव्य सेट्स आणि प्रभावी कथानकामुळे ‘दशावतार’ आजवरचा एक मोठा ब्लॉकबस्टर ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.

चित्रपटाची भव्यता, नेत्रदीपक दृश्यं आणि ताकदीचं कथानक यामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरकडे धाव घेत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील हा एक मैलाचा दगड ठरत असून 'दशावतार' ने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांच्या मनातही राज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तर थिएटर मालकही मराठी चित्रपटांना प्राधान्य देत शोज वाढवतात हे दिसून येत आहे.

झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande