भुसावळ रेल्वे स्थानकावर स्पेशल कॅम्प कोर्टची कारवाईत ३५२ प्रकरणांवर सुनावणी
जळगाव , 18 सप्टेंबर (हिं.स.) भुसावळ येथील रेल्वे स्थानकावर मंगळवारी लोहमार्ग न्यायालयाच्या देखरेखीखाली स्पेशल कॅम्प कोर्ट आयोजित करण्यात आले. या विशेष मोहिमेत रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि वाणिज्य विभागाने संयुक्तपणे कारवाई करत विविध प्रकारच्या नियमभं
भुसावळ रेल्वे स्थानकावर स्पेशल कॅम्प कोर्टची कारवाईत ३५२ प्रकरणांवर सुनावणी


जळगाव , 18 सप्टेंबर (हिं.स.) भुसावळ येथील रेल्वे स्थानकावर मंगळवारी लोहमार्ग न्यायालयाच्या देखरेखीखाली स्पेशल कॅम्प कोर्ट आयोजित करण्यात आले. या विशेष मोहिमेत रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि वाणिज्य विभागाने संयुक्तपणे कारवाई करत विविध प्रकारच्या नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत पॅन्ट्रीकार, महिला कोच, दिव्यांगजन कोच तसेच स्टेशन परिसरातील अतिक्रमण, अवैध धूम्रपान, ट्रेसपास, हॉकर्स आणि वेंडर्स यांच्यावर विशेष भर देण्यात आला. वाणिज्य विभागाने ८३ प्रकरणांमधून ५३ हजार २५० इतका दंड वसूल केला. पॅन्ट्रीकारवरील कारवाईतून १० हजार दंड आला. रेल्वे अधिनियम अंतर्गत १५९ प्रकरणांची नोंद. स्पेशल कोर्टात एकूण ३५२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यात भुसावळ स्टेशनची ९४ प्रलंबित प्रकरणे ५५ प्रलंबित ट्रायल प्रकरणे RPF यार्ड भुसावळची ४४ प्रकरणांचा समावेश आहे.३५२ प्रकरणांवर सुनावणी होऊन १ लाख ९८ हजार २० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे विशेष कोर्ट आणि संयुक्त कारवाया भविष्यातही सातत्याने राबवण्यात येणार आहेत. रेल्वे परिसरातील शिस्त, स्वच्छता व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे, असे निरीक्षक पी. आर. मीना यांनी सांगितले. रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण, बेकायदेशीर विक्रेते आणि अन्य नियमभंग यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाची ही कारवाई प्रभावी ठरली आहे. भविष्यातही अशाच कठोर कारवाया होणे अपेक्षित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande