लातूर : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उजनी गावास भेट देऊन नुकसानीचा घेतला आढावा
लातूर, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांनी आज औसा मतदारसंघातील उजनी गावास भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला तसेच राष्ट्रीय महामार्गालगत नाली न बांधल्यामुळे वाहतुकीला येत असलेल्या अडचणींची माहि
अ


लातूर, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांनी आज औसा मतदारसंघातील उजनी गावास भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला तसेच राष्ट्रीय महामार्गालगत नाली न बांधल्यामुळे वाहतुकीला येत असलेल्या अडचणींची माहितीही घेतली.

पालकमंत्री महोदयांनी उजनी गावातून धुता ककासपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधकाम करण्यासाठी तातडीने नाबार्ड अंतर्गत प्रस्ताव सादर करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना तसेच तेरणा नदीवरील पुलाचे पुनर्बांधकाम तातडीने सुरु करण्यात यावे अशा सूचना प्रकल्प संचालक, नांदेड यांना दिल्या.

नुकसानभरपाईसाठी पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचेही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुभाषराव जाधव, उजनीचे प्रवीण कोपरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व उजनी ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande