मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे काम तात्काळ सुरू करा - खा.प्रणिती शिंदे
सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। गेली अनेक वर्ष रखडलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे काम तात्काळ सुरू करावे. या मागणीसह मंगळवेढ्यातील अन्य प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या मागणीची निवेदन खा. प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे काम तात्काळ सुरू करा - खा.प्रणिती शिंदे


सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। गेली अनेक वर्ष रखडलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे काम तात्काळ सुरू करावे. या मागणीसह मंगळवेढ्यातील अन्य प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या मागणीची निवेदन खा. प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात भेटून दिले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आ.अभिजीत पाटील,प्रदेश सचिव अँड रविकिरण कोळेकर,काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन होऊन एक वर्ष झाले. या योजनेच्या कामासाठी निधीची उपलब्धता करून तात्काळ सुरू करण्यात यावे.प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या बांधकामाची बांधकाम पूर्ण करण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे.शासनाने प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला पाच ब्रास मोफत वाळू देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. सध्या मंगळवेढा तालुक्यात 9368 घरकुलांना मंजुरी देण्यात आले आहे तर 109 लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिली. उर्वरित लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी. संततधार पावसामुळे तालुक्यातील शेतकय्राच्या खरीप पिकाचे (बाजरी,तूर, मका,कांदा,उडीद,सूर्यफूल) व फळबागांचे (डाळीब) नुकसान झाले. त्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत नुकसान भरपाई निश्चितीसाठी 65 मिलिमीटर पावसाची अट शिथिल करण्यात यावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande