आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला
अबुधाबी, 18 सप्टेंबर (हिं.स.)आशिया कपमध्ये पाकिस्तानने यूएईचा पराभव केला. यामुळे २१ सप्टेंबर रोजी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकमेकांसमोर येतील हे निश्चित झाले. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून सहज पराभव केला होता. पाकिस्तानने य
भारत आणिपाकिस्तान संघ


अबुधाबी, 18 सप्टेंबर (हिं.स.)आशिया कपमध्ये पाकिस्तानने यूएईचा पराभव केला. यामुळे २१ सप्टेंबर रोजी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकमेकांसमोर येतील हे निश्चित झाले. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून सहज पराभव केला होता.

पाकिस्तानने यूएईचा पराभव करून भारतासह गट अ मधून सुपर ४ टप्प्यात प्रवेश केला. सुपर ४ मधील उर्वरित दोन संघ आता गट ब मधून असतील. या फेरीत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळेल. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आणखी एक सामना निश्चित झाला आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेपूर्वीच सुपर ४ टप्प्याचे वेळापत्रक अंतिम केले होते. यामध्ये, गट अ मधून पात्र ठरलेल्या दोन्ही संघांना ए१ आणि ए२ असे नाव देण्यात आले होते. तर गट ब मधून पात्र ठरलेल्या संघांना बी१ आणि बी२ असे नाव देण्यात आले. वेळापत्रकानुसार, गट अ १ आणि ए२ मधील सामना २१ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. अशाप्रकारे, रविवारी ग्रुप अ मधील भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एका मोठ्या सामन्यात एकमेकांसमोर येतील.

टीम इंडियाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी सामना ७ विकेट्सने सहज जिंकला होता. सामन्यानंतर आणि टॉस दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघा यांच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्यानंतर सलमान आघाने सामन्यानंतरच्या कार्यक्रमात मुलाखत देण्यास नकार दिला.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हस्तांदोलन न करण्याच्या घटनेचे वर्णन खेळाच्या भावनेविरुद्ध केले. बोर्डाने आयसीसीमधून सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणीही केली होती. पण आयसीसीने ही विनंती फेटाळून लावली. वादानंतर, पाकिस्तान संघ आता त्याच स्पर्धेत पुन्हा भारताविरुद्ध खेळणार आहे.

भारत आणि पाकिस्तान सुपर फोरमध्ये पोहोचल्याने, ग्रुप अ मधील उर्वरित दोन संघ, ओमान आणि यूएई, स्पर्धेतून बाहेर पडले. यूएईने त्यांच्या तीन सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला. ओमानच्या संघाचा दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. आता संघाचा शेवटचा सामना १९ सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande