कर्णपुरा यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीचा छ. संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। कर्णपूरा यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. यात्रेत येणाऱ्या भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आदी सेवा देतांनाच यात्रेच्या निमित्ताने जमणाऱ्या भाविक
Q


छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

कर्णपूरा यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. यात्रेत येणाऱ्या भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आदी सेवा देतांनाच यात्रेच्या निमित्ताने जमणाऱ्या भाविकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

कर्णपूरा यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, मनपा अपर आयुक्त रणजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, वाहतुक शाखा उपायुक्त भुजंग तसेच अन्न औषध प्रशासन विभाग, विज वितरण कंपनी, अग्निशमन विभाग, महानगरपालिकेचे सर्व विभाग तसेच छावणी परिसराचे अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, यात्रोत्सवात पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता सुविधा, आरोग्य सुविधा व सतर्क पोलीस यंत्रणा यांची सज्जता असावी. सर्व विभागांचा मिळून एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापित करावा. खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडील पदार्थांची तपासणी करावी. रुग्णवाहिका व अग्निशमन बंब वाहतुकीसाठी पुरेसी जागा असावी. यात्रोत्सवातील आवश्यक परवानग्यांसाठी यात्रा स्थळीच कक्ष स्थापन करावा. यात्रोत्सवात शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

पोलीस दलाने सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवावी. सीसीटीव्ही कॅमेरे लावून गर्दीवर नियंत्रण ठेवावे. दामिनी पथक तैनात ठेवावे. याशिवाय साध्या वेशातील पोलीस सज्ज ठेवावे,अशा सुचनाही त्यांनी केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande