मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिरासह 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात
* पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ''आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा'' या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर आज मुंबई भाजप अध्
आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा


आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा


अमित साटम उपक्रम


अमित साटम उपक्रम


* पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम

मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर आज मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपने मुंबईतील प्रतिष्ठित डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून संपर्क कार्यक्रम सुरू करत त्यांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतली.

मंगळवारी मुंबई भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केलेल्या या मोहिमेचा उद्देश मुंबईकरांशी संवाद साधून त्यांच्या मते आणि मागण्या जाणून घेणे हा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपने वांद्रे पश्चिम येथील डब्बावाला भवन येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. डबा वितरणसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध प्रणाली असलेल्या मुंबईतील डब्बेवाले त्यांच्या अचूकता आणि अतुलनीय सेवेसाठी ओळखल्या जातात. मुंबईततील डबेवाले ही आवज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा या उपक्रमात भाग घेणारा पहिला ग्रुप ठरला.

मुंबई भाजप अध्यक्ष आणि अंधेरी (पश्चिम) येथील आमदार अमीत साटम यांनी आरोग्य शिबिरानंतर डब्बावालांसोबत दुपारचे जेवणही घेतले. मी त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि मुंबईच्या विकासासाठी त्यांची मते आणि सूचना ऐकल्या. डब्बावाला हे मुंबईच्या नोकर वर्गासाठी अत्यावश्यक सेवा देतात. त्यांची शिस्त आणि सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्य केली गेली आहे. ही मोहीम त्यांच्यापासून सुरू होणे योग्य आहे, असे आमदार अमीत साटम म्हणाले.

साटम यांनी पुढे सांगितले की, भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य मुंबईकरांकडून अभिप्राय जमा करतील. आगामी बीएमसी निवडणुकीसाठी त्यांचा अभिप्राय आणि मते भाजपच्या जाहीरनाम्याचा भाग बनतील. आम्हाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, असेही आमदार अमीत साटम पुढे म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande