पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पैठण तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या व्यथा घेतल्या जाणून
छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। आज पैठण येथील ढोरकिन, मुधलवाडी, राहुल नगर , कातपूर येथे विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने गंभीर समस्या निर्माण झ
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

आज पैठण येथील ढोरकिन, मुधलवाडी, राहुल नगर , कातपूर येथे विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी बांधवांची व्यथा जाणून घेतली. प्रशासनातील अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून शक्य ती मदत तातडीने शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या या संकटाच्या काळात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत. असे सांगितले

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande