मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य - राहुल गांधी
नवी दिल्ली, १८ सप्टेंबर (हिं.स.) - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, कर्नाटकातील अलांड विधानसभा मतदारस
राहुल गांधी


नवी दिल्ली, १८ सप्टेंबर (हिं.स.) - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, कर्नाटकातील अलांड विधानसभा मतदारसंघातून ६,०१८ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ते म्हणाले की, हे एका संघटित कटाचा भाग आहे. आणि केवळ काँग्रेस समर्थक मतदारांना लक्ष्य केले जात आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, मतदार यादीतून नावे वगळण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आणि केंद्रीकृत केली जात आहे. अलांड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस समर्थक मतदारांना लक्ष्य केले गेले आणि त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यांनी दावा केला की आतापर्यंत मतदार यादीतून वगळण्याच्या ६,०१८ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते. ते म्हणाले की, मतचोरीचे हे प्रकरण चुकून उघड झाले जेव्हा बूथ-लेव्हल ऑफिसर म्हणजेच बीएलओच्या नातेवाईकाचे नाव यादीतून गहाळ असल्याचे आढळले. चौकशीत असे दिसून आले की, ही प्रक्रिया एका तृतीय पक्षाद्वारे केली जात होती आणि ती स्वयंचलित सॉफ्टवेअर वापरून चालवली जात होती. त्यांनी सांगितले की, या प्रक्रियेदरम्यान ज्या व्यक्तीचे नाव यादीतून काढून टाकण्यात आले होते त्याचे नाव त्यांच्या शेजाऱ्याचे असल्याचे उघड झाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा बीएलओने शेजाऱ्याला विचारले तेव्हा त्यांनी वगळण्यास नकार दिला. त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की, ही काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन स्वयंचलित प्रक्रियेद्वारे करण्यात आली होती. आणि वापरलेले मोबाइल नंबर कर्नाटकाबाहेर होते. मतदार यादीतून काढून टाकण्यात आलेल्या नावांबाबत गंभीर प्रश्न उद्भवतात: ते नंबर कोणाचे आहेत. ते कुठे चालवले जातात आणि त्यांचे आयपी पत्ते काय आहेत. शिवाय काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान ओटीपी कोणाला मिळाला आणि त्या नंबरवर कॉल केल्यावर कोणीही का उत्तर दिले नाही.

त्यांनी या प्रकरणात अनेकांची बाजूही मांडली. पहिल्या प्रकरणात गोदाबाई नावाच्या महिलेचा समावेश होता. जिच्या नावाने १२ लोकांची नावे काढून टाकण्यात आली होती. जरी गोदाबाईंना याची माहिती नव्हती. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, हे कोणाच्या संगनमताने घडले. दुसऱ्या प्रकरणात सूर्यकांत नावाच्या एका पुरूषाचा समावेश होता. ज्याच्या नावाने फक्त १४ मिनिटांत १२ मतदारांची नावे काढून टाकण्यात आली. पण जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्टपणे नाकारले. तिसऱ्या प्रकरणात नागराजचा समावेश होता. या उदाहरणावरून असे दिसून येते की संपूर्ण यंत्रणा सॉफ्टवेअरद्वारे चालवली जात आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, सॉफ्टवेअर मतदार यादीतून काढून टाकण्यात येणाऱ्या पहिल्या नावांना लक्ष्य करत आहे. काँग्रेसची मजबूत स्थिती असलेल्या १० बूथमध्ये मोठ्या प्रमाणात वगळण्यात आले. २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसने या १० बूथपैकी ८ जिंकले होते. पण यावेळी ६,००० मतदारांची नावे काढून टाकण्यात आली. हे सर्व काँग्रेस समर्थक मतदारांना लक्ष्य करून एका संघटित कटाचा भाग आहे.

त्यांनी विचारले की, वेगवेगळ्या राज्यांमधील मतदार यादींमध्ये केंद्रीय फेरफार करणारा तिसरा माणूस कोण आहे. हीच प्रक्रिया उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार आणि महाराष्ट्रात अवलंबण्यात आली आहे. हे केवळ आंध्र प्रदेशपुरते मर्यादित नाही. विविध मतदारसंघांमधील काँग्रेस मतदारांना लक्ष्य करून मतदार यादीतून नावे पद्धतशीरपणे वगळण्यात आली आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, आयोग झोपलेला असल्याचा दावा करू शकत नाही. सत्य हे आहे की, आयोगाला सर्व काही माहित आहे. आणि तो या मतदान चोरीला मदत करत आहे. राहुल म्हणाले की, हा लोकशाहीवर थेट हल्ला आहे आणि काँग्रेस या मुद्द्यावर गप्प बसणार नाही. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे आणखी पुरावे आहेत. जे ते भविष्यात देशासमोर सादर करतील. राहुल म्हणाले की हायड्रोजन बॉम्ब चे पुरावे लवकरच समोर येतील. आजचा खुलासा हा त्या मालिकेचा एक भाग आहे. त्यांनी जरी स्पष्ट केले असले की, हा हायड्रोजन बॉम्ब नाही पण खरे स्फोटक पुरावे अजून येणे बाकी आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande