अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापुर येथील कृषी क्षेत्राची पाहणी केली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह अधिकारी व विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक आदी उपस्थित होते.
वणी रंभापुर येथे विद्यापीठाचे सर्वात मोठे बीज उत्पादन प्रक्षेत्र आहे. तिथे १ हजार १०० एकरावर बीज उत्पादन प्रकल्प आहे. त्याची पाहणी करून कृषी मंत्र्यांनी प्रत्येक घटकाची माहिती जाणून घेतली. तेथील संशोधन व प्रयोगांचे त्यांनी कौतुक केले. कृषी विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कृषिमंत्री श्री. भरणे यांच्या उपस्थितीत विद्यापीठातर्फे उद्या (२० सप्टेंबर) सकाळी ११ वाजता शिवार फेरी व थेट प्रात्यक्षिकांचा शुभारंभ होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे