शेतकरी नेते राकेश टिकेत यांची सरकारवर टीका!
अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की “विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत, कारण शे
प


अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)।

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.

आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की “विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत, कारण शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीप्रमाणे (MSP) पैसे मिळत नाहीत. याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत.”टिकैत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं, कायदे मागे घेण्यात आले, मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. त्यामुळे एका मोठ्या आंदोलनाची गरज असून, दिल्लीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभारणार आहोत असा इशारा त्यांनी दिला.

सरकारच्या धोरणांवर टीका करताना टिकैत म्हणाले, सरकारची पॉलिसीच शेतकऱ्यांचं नुकसान करण्याची आहे..त्यांनी सर्व राजकीय पक्षांवरही खोचक टीका केली. देशात आज कुठेच खरी विरोधी पक्षाची ताकद नाही तर विपक्ष असता तर देशात तानाशाही नसल्याचं ते म्हणाले.त्याच प्रमाणे कोणत्याही राज्यात विपक्ष उरलेला नसल्याचाही ते बोलले. आमच्या सोबत कोणताही पक्ष नाही, आमच्या सोबत सामान्य जनता आणि शेतकरी आल्याचं टिकैत म्हणाले.

या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाचा सूर देशभरात घुमण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande