कापूस विक्री नोंदणीसाठी उरले शेवटचे 10 दिवस
अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)। कापूस हंगाम २०२५-२६ मध्ये आधारभूत किंमतीनुसार कापूस विक्री करण्यासाठी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी “कपास किसान” या मोबाईल अप्लिकेशनव्दारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरचे अॅप दि. ३० ऑ
कापूस विक्री नोंदणीसाठी उरले शेवटचे 10 दिवस


अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)।

कापूस हंगाम २०२५-२६ मध्ये आधारभूत किंमतीनुसार कापूस विक्री करण्यासाठी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी “कपास किसान” या मोबाईल अप्लिकेशनव्दारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरचे अॅप दि. ३० ऑगष्ट २०२५ पासून गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल आईओएस अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. सदर मोबाईल अॅप शेतकऱ्यांनी डाऊनलोड करून दि. १ सप्टें ते ३० सप्टें २०२५ पर्यंत नोंदणी करून घ्यावी. पूर्व नोंदणी विंडो दि. १ सप्टें ते ३० सप्टें २०२५ पर्यंत सुरू राहिल. सदर नोंदणीकरीता केवळ १० दिवसांचा अवधी शिल्लक असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दि. ३० सप्टें पुर्वी कपास किसान अॅपवर नोंदणी करावी, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी केले आहे.

कापूस पिकाची नोंद करण्यासाठी

१) सातबारा उतारा २) सातबारा उतारावर कापुस पिकाची नोंद (२०२५-२६ चे ऑनलाईन अद्यावत) ३) आधार कार्ड ४) शेतकऱ्याचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. सदर अॅपवर शेतकरी ७ दिवसात स्लॉटच्या उपलब्धतेनुसार विक्रीची त्यांची पसंतीची तारीख निवडू शकतात. स्लॉट बुकींग केल्यानंतर केवळ नोदणींकृत शेतकरीच आधारभूत किंमती अंतर्गत भारतीय कापूस महामंडळाला कापूस विक्री करण्यास पात्र राहिल, असेही कापूस महामंडळाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande