नांदेड - तहसील कार्यालयासमोर सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा
नांदेड, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। आज नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील तहसील कार्यालयासमोर सकल बंजारा समाजाच्या वतीने आयोजित भव्य मोर्चास मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड यांनी उपस्थित राहून बांधवांशी संवाद साधला. या मोर्चाच्या माध्यमातून
अ


नांदेड, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। आज नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील तहसील कार्यालयासमोर सकल बंजारा समाजाच्या वतीने आयोजित भव्य मोर्चास मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड यांनी उपस्थित राहून बांधवांशी संवाद साधला. या मोर्चाच्या माध्यमातून मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट मधील नोंदीनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

या मागणीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र विशेषाधिकार समिती लवकरात लवकर स्थापन करावी, अशी आग्रही मागणी सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस यांना भेटून केली आहे.

यापुढेही संविधानाच्या चौकटीत राहून या मागणीसाठी मोठ्या स्वरूपात लढा उभा करण्यात येणार असून, हा लढा अंतिम निर्णयापर्यंत जाईपर्यंत या लढ्यात मी सोबत राहीन, असा शब्द दिला.

बंजारा (लमाण) समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटिअर (1920) नुसार अनुसूचित जमाती वर्ग आरक्षणाचा दर्जा देण्याबाबतचे निवेदन सकल बंजारा समाजाच्या वतीने हिमायतनगर चे तहसीलदार साहेब यांना सुपूर्द केले.

यावेळी डॉ. बी. डी. चव्हाण, रामराव महाराज भाटेगावकर, सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, माजी जि. प. सदस्य सुभाष राठोड, माजी जि.प. सदस्य समाधान जाधव, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, कंधार पं.स. सदस्य उत्तम चव्हाण, पारस राठोड, पं. स. सदस्य बालाजी राठोड, सरपंच गुलाब राठोड, राजेश जाधव, कैलास राठोड, संजय जाधव वडगावकर, डॉ. दामोदर राठोड, सुनील चव्हाण, दिलीप राठोड, रवी जाधव, सुभाष राठोड माजी जि. प. सदस्य डॉ संदीप जाधव व समाजातील प्रमुख पदाधिकारी आणि सकल बंजारा समाज बांधव आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande