राजापूरमधील मोकाट गुरांचे टॅगिंग होणार
रत्नागिरी, 19 सप्टेंबर, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याबरोबरच गुरांचे १०० टक्के टॅगिंग करण्याच्या सूचना राजापूरच्या प्रांताधिकारी डॉ . जस्मिन यांच्या सूचना यांनी दिल्या. सातत्याने वाह
मोकाट गुरांच्या बंदोबस्ताबाबतची बैठक


रत्नागिरी, 19 सप्टेंबर, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याबरोबरच गुरांचे १०० टक्के टॅगिंग करण्याच्या सूचना राजापूरच्या प्रांताधिकारी डॉ . जस्मिन यांच्या सूचना यांनी दिल्या.

सातत्याने वाहनांची रहदारी असलेल्या मार्गासह राजापूर शहरात ठिकठिकाणी मोकाट गुरे रस्त्यामध्ये ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अनेकवेळा अपघात होतात. त्यामुळे मोकाट गुरांच्या समस्येवर योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची निवेदनांद्वारे प्रशासनाकडे केली. या समस्येची दखल आमदार किरण सामंत यांनी घेतली आणि प्रशासनाला तातडीची बैठक आयोजित करण्याची सूचना दिली. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. तहसीलदार कार्यालयामध्ये झालेल्या या बैठकीला तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी श्री, जाधव, पोलीस निरीक्षक अमित यादव, पशुधन विकास अधिकारी डॉ. वेभव चोपडे, नगरपालिकेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता सुप्रिया पोतदार, आरोग्य निरीक्षक अमित पोवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत अरविंद लांजेकर, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, भाजपचे रवींद्र नागरेकर, फारूख साखरकर, मनोहर गुरव, दिवाकर आडविरकर, आजीम जैतापकर, मंदार ढेवळे यांनी चर्चेत भाग घेतला. मोकाट गुरांच्या समस्येवर योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पोलिस निरीक्षक श्री. यादव यांनी मोकाट गुरांच्या मालकांवर कशा पद्धतीने कायदेशीर कारवाई करता येईल याची माहिती दिली. डॉ. चोपडे यांनी इअर टॅगिंगद्वारे गुरांच्या मालकांचा शोध कसा घेता येईल, याची माहिती दिली. पालिकेद्वारे मोकाट गुरांवर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती श्रीमती पोतदार यांनी दिली.

चर्चेअंती मोकाट गुरांच्या मालकांचा शोध घेणे, कायदेशीर कारवाईला सहकार्य करणे यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरांचा मालक समजण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शंभर टक्के इअर टॅगिंग करण्याचेही ठरविण्यात आले.

बैठकीला अ‍ॅड. महेश नकाशे, विनोद शेलार, प्रसाद मोहरकर, उमेश पराडकर यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थ्ति होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande