रत्नागिरीत शनिवारी शतसंवादिनी कार्यक्रमातून गोविंदरावांना १०० संवादिनीवादक देणार मानवंदना
रत्नागिरी, 19 सप्टेंबर, (हिं. स.) : पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त ‘चैतन्यस्वर’ आणि ‘सहयोग रत्नागिरी’ यांच्या वतीने शनिवारी, दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात जाई काजळ प्रस्तुत ''शत
शतसंवादिनी


रत्नागिरी, 19 सप्टेंबर, (हिं. स.) : पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त ‘चैतन्यस्वर’ आणि ‘सहयोग रत्नागिरी’ यांच्या वतीने शनिवारी, दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात जाई काजळ प्रस्तुत 'शतसंवादिनी २.०' हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे.

गेल्या वर्षी २१ सप्टेंबरला १००हून अधिक संवादिनीवादकांच्या साथीने सादर झालेल्या शतसंवादिनी कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या वर्षी त्याचा पुढील भाग म्हणून ‘शतसंवादिनी २.०’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्येही १००पेक्षा अधिक संवादिनीवादक व तालवाद्य साथीदार सहभागी होणार असून, सुप्रसिद्ध नाट्यगीतांवर आधारित हार्मोनियम सिम्फनी सादर होईल.

या कार्यक्रमाची निर्मिती ज्येष्ठ संवादिनीवादक आणि संगीतकार अनंत जोशी यांच्या संकल्पनेतून झाली आहे. संपूर्ण संगीत दिग्दर्शन अनंत जोशी यांचे असून, रत्नागिरीतील सर्व हार्मोनियम शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी यात सहभागी आहेत. सूत्रसंचालन सौ. पूर्वा पेठे करणार आहेत. तबलासाथ आदित्य पानवलकर आणि प्रथमेश शहाणे यांची, तर इतर तालवाद्यांची साथ अद्वैत मोरे व राघव पटवर्धन यांची असेल. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीतकार आप्पा वढावकर, ज्येष्ठ तबला गुरू पं. आमोद दंडगे हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी ध्वनिसंयोजन ‘एस. कुमार साउंड सर्व्हिसेस’चे उदयराज सावंत, तर रंगमंच व्यवस्था ‘ओम साई डेकोरेटर्स’चे अमरेश सावंत करतील. कार्यक्रमासाठी जाई काजळ आणि टीजेएसबी बँक यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून अनबॉक्स, पितांबरी व पीएनजी हे सहप्रायोजक आहेत. याशिवाय फिनोलेक्स इंडस्ट्रीज, गणेश अॅग्रो टुरिझम, आर्ट अँड क्राफ्ट कलादालन, श्री सुगंधी, समर्थ इलेक्ट्रॉनिक्स, रिटकवली महालक्ष्मी स्पेशल शेवचिवडा आणि चंद्रविलास फरसाण यांचेही विशेष साह्य लाभले आहे.

कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला सुरुवातीपासूनच प्रचंड प्रतिसाद लाभत असून, तिकीटविक्री सध्या itsmyshow.in वर सुरू आहे. प्रयोग 'हाउसफुल'च्या दिशेने वाटचाल करत आहे. अगदी मोजकीच तिकिटे शिल्लक असल्याचे आयोजकांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande