सहकारी, खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांनी नागरिकांना शक्य तेवढी मदत द्यावी - सोलपूर जिल्हाधिकारी
सोलापूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे सात तालुक्यातील92गावे बाधित झालेल्या असून हजारो कुटुंब बाधित झालेली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्व कुटुंबांना जेवण,पाणी,आरोग्य तसेच जनावरांसाठी चारा अशा प्रकारची
Collactor kumar


सोलापूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे सात तालुक्यातील92गावे बाधित झालेल्या असून हजारो कुटुंब बाधित झालेली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्व कुटुंबांना जेवण,पाणी,आरोग्य तसेच जनावरांसाठी चारा अशा प्रकारची मदत तात्काळ सुरू केलेली आहे. परंतु अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची घरांचे,शेती पिकांचे व जनावरांचे नुकसान झालेले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी बँका,खाजगी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना जेवढी शक्य असेल ती मदत बाधित नागरिकांसाठी द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पूरग्रस्त बाधित नागरिकांना मदत देण्याच्या अनुषंगाने सर्व सहकारी बँकेचे चेअरमन,मुख्याधिकारी तसेच खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्हा प्रतिनिधी यांच्या समवेत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे, जिल्हा सहकारी उपनिबंधक किरण गायकवाड,निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील,रोहयो उपजिल्हाधिकारी अंजली मरोड,तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व सहकारी खाजगी व राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की,ज्या बँकांना आर्थिक स्वरूपात मदत करायची आहे,त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करावी. तसेच ज्या बँकांना जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य किटच्या रूपात मदत उपलब्ध करून द्यायचे असेल त्यांनी जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय मदत कक्षाकडे आपली मदत पाठवावी. पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. त्यामुळे सर्व बँकांनी सढळ हाताने मदत देऊन सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त व पुरग्रस्तांच्या सार्वजनिक हितासाठी नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यांत या उद्देशाने मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून, मदत कक्षामार्फत आवश्यक ती मदत करुन बाधित नागरिकांचे प्रश्न तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागांशी संपर्क साधून सोडविण्यात येतील. या मदत कक्षाच्या माध्यमातून 92बाधित गावांपैकी कोणत्या गावाला कोणत्या प्रकारची मदतीची आवश्यकता आहे याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे गरजू बाधितग्रस्तांना केलेली मदत तात्काळ देणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्री. सैपन नदाफ मोबाईल क्रमांक83799 81799तर दूरध्वनी क्रमांक0217-2990140यावर संपर्क साधावा.

उत्तर सोलापूर तालुक्यात श्री सुधाकर बंडगर,निवडणूक नायब तहसिलदार,मोबाईल क्रमांक9881741311,कार्यालयीन क्रमांक0217-2731014;माढा तालुक्यात श्री प्रितम पवार,पुरवठा निरीक्षक,मोबाईल क्रमांक9970827574,कार्यालयीन क्रमांक02183-234031;करमाळा तालुक्यात श्री शतुघ्न चव्हाण,पुरवठा निरीक्षक,मोबाईल क्रमांक8805907686,कार्यालयीन क्रमांक02182-220535;बार्शी तालुक्यात श्री संतोष गुलाब शिंदे,पुरवठा निरीक्षक,मोबाईल क्रमांक9518562532,कार्यालयीन क्रमांक02184-222213;अपर तहसिल मंद्रुप येथे श्री नवल सरवळे,सहा. महसूल अधिकारी,मोबाईल क्रमांक9309597368;दक्षिण सोलापूर तालुक्यात श्री विनायक कुलकर्णी,निवडणूक नायब तहसिलदार,मोबाईल क्रमांक9423331657,कार्यालयीन क्रमांक0217-2731033;तर मोहोळ तालुक्यात श्रीमती सोनाली निटुरे,पुरवठा निरीक्षण अधिकारी,मोबाईल क्रमांक9022008681,कार्यालयीन क्रमांक02189-232234.नागरिकांनी पूरग्रस्त मदतीसाठी संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

ज्वारीचे पीठ,आटा,हरभरा दाळ,स्वयंपाक तेल,मीठ,तिखट मसाला,हळद,दूध पावडर,मेणबत्ती पाकीट मध्यम आकाराचे,मच्छर आगरबत्ती,काडीपेटी,टॉर्च विथ बॅटरी,इमरजन्सी लाईट,अंगाचे साबण,प्लास्टीक ताडपत्री,चादर,सतरंजी तसेच पातेला,तवा,ताट,तांबे,वाटी,चमचा,ग्लास,उलतन,पक्कड/सांडशी,पळी (आमटी वाढण्यासाठी),प्लास्टीक बकेट अशा आवश्यक मूलभूत वस्तूंचा समावेश आहे. परंतु ज्यांना मदत द्यायची आहे त्यांनी या वस्तू व्यतिरिक्तही मदत देऊ शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande