नवी दिल्ली, 29 सप्टेंबर (हिं.स.) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संविधानाचा मसुदा आणि इतर सुधारणा मंजूर करण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने १२ ऑक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. जागतिक फुटबॉल प्रशासकीय संस्था फिफाने एआयएफएफला नवीन संविधान स्वीकारण्यासाठी ३० ऑक्टोबरची अंतिम मुदत दिली आहे.
एआयएफएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विशेष सर्वसाधारण सभा एका विशिष्ट अजेंड्यासाठी बोलावण्यात आली आहे. ती फक्त संविधान स्वीकारण्यासाठी आहे आणि दुसरा कोणताही अजेंडा नाही. एसजीएम राष्ट्रीय राजधानीत आयोजित केली जाणार आहे. जिथे एआयएफएफचे मुख्यालय आहे.
१९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने एआयएफएफच्या संविधानाच्या मसुद्याला काही सुधारणांसह मान्यता दिली आणि फुटबॉल संघटनेला चार आठवड्यांच्या आत तो स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे